राज्य सरकार आणि गुगलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सामजंस्य करार; उपमुख्यमंत्री याबाबत काय म्हणाले ? वाचा थोडक्यात..

Update: 2024-02-08 14:45 GMT

.“एआय फॉर महाराष्ट्र” (Ai for Maharashtra) या योजनेअंतर्गत राज्य सरकार आणि गुगलमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृत्रीम बुध्दिमत्तेबाबत(Artificial Intellegence) सामंजस्य करार झाला. यात कृषी, आरोग्य, कौशल्य स्टार्टअप शाश्वतता यासह विविध क्षेत्राचा समावेश आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषदेत दिली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, सात विविध क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीने आर्टीफिशीअलचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची ऍप्लीकेशन (Application) ज्याच्या माध्यमातून नागरीकांचं जिवन हे चांगलं होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. ज्यामध्ये शेती, शाश्वत विकास, स्टार्टअप, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रित काम करणार आहोत.

आज ज्या प्रकारे आर्टीफिशिअल इंटेलिजेन्समूळे लोकांचं जिवन वेगानं बदलू शकतं, याचा सगळा आम्ही उपयोग करून घेणार आहोत.नागपूरमधल्या ट्रिपल आयटीत एआय(Ai) संदर्भातलं उत्कृष्ट केंद्र उभारण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली. या केंद्रातून एआय संबंधी संशोधन, ऍप्लिकेशन तयार करणे, तसेच एआय स्टार्टअपसाठी परीसंस्था तयार करण्यात येईल अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

Tags:    

Similar News