नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न, स्थानिकांचा सिडको कार्यालयावर धडक देण्याचा इशारा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता चांगलाच पेटला आहेत. विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. पण स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली आहे. या मागणीसाठी आज आंदोलकांनी सिडको कार्यालयाला घेरबाव घालण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी अडवले तर तिथेच ठिय्या आंदोलन करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाच्या इशाऱ्यामपळे पोलिसांनी सिडको मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी केली आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते जाहीर होण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, वसंतराव नाईक यांचे नवी मुंबई निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबईमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे अशी मागणी महंत सुनील महाराज यांनी केली आहे. बंजारा समाजाच्या वतीने बुधवारी विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.