दादू-दादा एकदा स्वत:च्या पैशाने पेट्रोल भरुन बघा !

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पेट्रोलवर 8 रुपये तर डिझेलवरची 6 रुपये एक्साईज ड्युटी कमी केली आहे. तर यापुर्वीही केंद्र सरकारने 5 रुपयांची कपात केली होती. मात्र राज्य सरकारने अजुनही इंधनाचे दर कमी केले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारनेही कर कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Update: 2022-05-21 14:51 GMT

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पेट्रोलवर 8 रुपये तर डिझेलवरची 6 रुपये एक्साईज ड्युटी कमी केली आहे. तर यापुर्वीही केंद्र सरकारने 5 रुपयांची कपात केली होती. मात्र राज्य सरकारने अजुनही इंधनाचे दर कमी केले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारनेही कर कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 9 रुपये 50 पैसे तर डिझेलच्या दरात 7 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वीही केंद्र सरकारने 5 रुपये कर कपात केली होती. मात्र राज्य सरकारने अजुनही इंधन दरात कपात करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून सरकारने दिलासा देण्याची मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने कर कमी करण्याचे आवाहन केले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी महागाई वाढलेली आहे, सरकार यावर काहीच करत नसल्याची टीका होत असताना आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लीटरमागे ८ रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे पेट्रोल लिटरमागे साडे नऊ रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे केंद्र सरकारवर दरवर्षी १ लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची माहितीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. ज्या राज्य सरकारांनी आपापले कर आतापर्यंत कमी केलेले नाहीत, त्यांनीही राज्यातील कर कमी करावे असे आवाहन निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

याचबरोबर उज्ज्वला योजनेत ज्या महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे, त्यांना वर्षाला १२ सिलेंडरसाठी २०० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारने सिमेंट तसेत प्लास्टीक आणि लोखंड यांच्या किंमती कमी करण्यासाठीही काही निर्णय घेतल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका होते आहे. विरोधकांनीही देशभरात विविध ठिकाणी महागाईविरोधात आंदोलनं सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Tags:    

Similar News