बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अंबादास दानवे यांचे गृहमंत्रालयावर गंभीर प्रश्न

Update: 2024-10-13 06:43 GMT

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील गृह खात्याविषयी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वता:च्या x हॅंडलवर पोस्ट करत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांनी खालील प्रश्न उपस्थित केले आहेत:

अंबादास दानवे यांनी उपस्थित केले प्रश्न;

पूर्णवेळ गृहमंत्री: महाराष्ट्राला खरंच एक पूर्णवेळ गृहमंत्री आहे का, याबद्दल शंका उपस्थित झाली आहे?

आरोपींचा मागमूस: हत्या करणारे आरोपी दोन महिने अगोदर मुंबईत आले होते आणि भाड्याने राहत होते. त्यांच्या उपस्थितीचा पोलिसांना कसा मागमूस लागला नाही, ?

बंदूक पुरवठा: आरोपींना बंदूक दिली गेली, तरीही पोलिसांना याबाबत काही माहिती का मिळाली नाही?

हेर खात्याची कार्यवाही: पोलिसांनी हेर खात्यावर पैसे खर्च करणे थांबवले आहे का?

सुरक्षा पुरवठा: पोलिसांनी सुरक्षेचा पुरवठा करून आपली जबाबदारी संपवली का? जर असे असेल, तर हा हलगर्जीपणा कोणाचा आहे, याबद्दलही दानवे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अंबादास दानवे x हॅंडलवरील पोस्ट मध्ये असे पुढे म्हणतात "स्वतःला काडतुस-काडतुस म्हणून घेणाऱ्या गृहमंत्र्यांना आता लोकही फडतूस म्हणू लागले आहेत. महाराष्ट्रातील पक्षफोडीचे मास्टरमाईंड आणि अधून मधून गृहमंत्री असलेल्या या माणसावर आणि त्याच्या खात्यावर सामान्य जनतेला काडीचा विश्वास उरलेला नाही." असे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे म्हणणे आहे.

अलीकडील काळात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर चिंता व्यक्त होत आहे

Tags:    

Similar News