नाशिकमधील मराठमोळ्या स्टार्टअपची आदित्य ठाकरेंकडुन दखल

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौर्यावर असताना रिव्हॅम्प कंपनीच्य़ा कारखान्याला भेट दिली.या कंपन्याक़डुन निर्माण केल्या जाणार्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन देऊन इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर आपण वाढवण्यासाठी एमआयडीसीसोबत एकत्र करु शकतो. असे ट्विटरच्या माध्यमातुन म्हटलं आहे.

Update: 2022-01-28 15:09 GMT

"काही दिवसांपूर्वीच मला शार्क टँक इंडियामधील एका क्लिपमधून नाशिकमधील रिव्हॅम्प या कंपनीबद्दल कळलं. ही कंपनी पूर्णपणे मेड इन इंडिया इलेक्ट्रीक बाईक्स बनवते. आज मी नाशिकमध्ये असताना या कंपनीच्या टीमला भेटलो. या कंपनीकडून निर्माण केल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर वाढवण्यासाठी आपण एमआयडीसोबत एकत्र काम कसं करु शकतो, याबद्दल या टीमशी चर्चा केली," असं आदित्य यांनी म्हटलं आहे. असं ट्विटरच्या माध्यमातुन आदित्य यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे हे मागील बर्याच काळापासुन राज्याचे इलेक्ट्रीक व्हेइकल धोरण म्हणजेच इलेक्ट्रीक वाहनांसंदर्भातील नियम निश्चिती, अधिक वापर वाढण्यासंदर्भातील काम करत आहेत. मध्यंतरी त्यांनी पुण्यामधील काही कंपन्यांच्या कारखान्यांना भेटही दिली होती. मात्र आता आदित्य ठाकरे हे सोनी टीव्हीवरील शार्क टँक इंडियावरील एका कार्यक्रमामध्ये आलेल्या इलेक्ट्रीक बाईक बनवणाऱ्या नाशिकमधील कंपनीच्या कारखान्यात पोहचले.

Tags:    

Similar News