भारताला जागतिक अंतराळ विश्वात महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अदित्य L1 चं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हि मोहिम यशस्वी ठरली आहे. श्रीहरीकोटा येथून भारताचं ADITYA-L1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. भारताची ही पहिलीच सौर मोहीम यशस्वी ठरली आहे.
सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 हे यान लॉन्च केलं गेलं आहे. आता हे यान अनेक टप्प्याने पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेलं आहे. 125 दिवसानंतर हे आदित्य एल 1 पोहोचणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवल्यानंतर भारताने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. स्पेस स्टेशनमधून हे यान यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं आहे. आज लॉन्चिंग झाल्यानंतर हे यान 125 दिवसानंतर एल-1 पॉइंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आदित्य एल 1 हे तिथून महत्त्वाचा डेटा पाठवणार आहे. त्यावरून अनेक महत्त्वाची माहिती मिळणार आहे.
भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भारताला नवा इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे. सौर मिशनमधून केवळ भारतालाच नव्हे तर जगाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सूर्याबाबतच्या संशोधनाला नवी कलाटणीही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारताने हे मिशन हाती घेतलं आहे.