किरण माने उद्या बाँब फोडणार, विविध खुलासे करणार
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गुरूवारी किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत पत्रकार परिषदेतून मोठे खुलासे करणार असल्याचे सांगितले आहे.;
: स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गुरूवारी किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत पत्रकार परिषदेतून मोठे खुलासे करणार असल्याचे सांगितले आहे.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेते किरण माने हे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. तर ते सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असतात. मात्र त्यांनी केलेल्या राजकीय पोस्टमुळे किरण माने त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप किरण माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर किरण माने यांच्या समर्थनार्थ फेसबुक आणि ट्वीटरवर ट्रेंड चालवत हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर मालिकेतील काही कलाकारांनी माध्यमांसमोर येत किरण माने यांनी त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना काढून टाकल्याचे सांगितले. मात्र किरण माने यांच्यावर केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्यानंतर किरण माने 4 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत आपले अनेक खुलासे करणार आहेत, अशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली.
पुढे किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "खुप खुलासे करायचे आहेत. खुप गुपीतं उघडायची आहेत. हा माझा एकट्याचा लढा नसुन तुम्हा सगळ्यांचा आहे. कटकारस्थान करुन तुम्हाला कामावरुन काढायची हिम्मत झाली नाही पाहीजे कुणाची. संविधानिक मार्गाने दाखवतो तुम्हाला किरन माने पॅटर्न. पैशाचा,सत्तेचा माज आणि वर्चस्वादाचा माज एकच गोष्ट उतरवु शकते ते म्हणजे संविधान. ९९% टक्के राजकीय नेते भांडवलदारांचे गुलाम आहेत. माझ्यावर अन्याय करणारी यंत्रना पैशांच्या धुंदीत आहे. कोण शुल्लक, सामान्य माणुस आपल्याशी लढु पाहतोय. खड्या सारखा बाजुला करा त्याला अशा मग्रुरीत आहेत ही धेंड".
"मुजोरी, बेबंदशाही मोडुन काढाण्याचा शेवटचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात दिला आहे.जीवाचं रान करेन, पण न्याय मिळवेन,या लोकांनी अन्याय करायला खुप चुकीचा माणुस निवडला आहे.नाय यांची पळता भुई थोडी केली तर किरण माने नाव लावणार नाही".. असे किरण माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातुन लिहीले आहे.
सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवलाय. त्यापार्श्वभुमीवर किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून उद्या बाँब फोडणार असल्याचे म्हटले आहे.