Tarak Mehta का उल्टा चश्मा फेम 'नट्टू काका' अभिनेते घनश्याम नायक यांचे दुख:त निधन

Update: 2021-10-04 03:29 GMT

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमधील नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचे दुख:त निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांच्या निधनाबाबत माहिती दिली. मागील काही दिवसांपासून घनश्याम नायक यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांना कर्करोग झाला होता. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. घनश्याम यांच्यावर काही महिन्यांअगोदर एक शस्त्रक्रिया झाली होती.

मागील 50 हून अधिक वर्षांपासून घनश्याम नायक प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेनं त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी दिली. या मालिकेतून ते घराघरात पोहोचले होते. नट्टू काका या पात्राला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली. नट्टू काका हे या मालिकेच्या सुरुवातीपासून जोडले होते. त्यांची एक विनोदी शैली, त्यांचे संवाद प्रेक्षकांना आवडायचे.

नट्टू काका यांच्या निधनानंतर अनेक कलाकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यासोबतच्या आठणींना उजाळा दिला आहे. काही दिवसांअगोदर त्यांनी एका मुलाखतीत शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. 'मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे', असे भावूक होऊन ते म्हणाले होते. त्यांच्या जाण्याने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News