#FarmerProtest : ABP न्यूजच्या पत्रकाराने किसान मंचवरुन दिला नोकरीचा राजीनामा

Update: 2021-02-27 12:00 GMT

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता तीन महिने उलटले आहेत. या आंदोलनात काही माध्यमांना गोदी मीडिया म्हणत थेट बंदी घालण्यात आली होती. पण आता ABP न्यूजचे पत्रकार रक्षित सिंग यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या व्यासपीठावरुनच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भातले सत्य मांडण्यापासून आपल्याला रोखले जात असल्याचे सांगत रक्षीत सिंग यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

रक्षीत सिंग यांना महिना १ लाख रुपये पगार होता, पण सत्य दाखवण्यापासून आपल्याला रोखले जात असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी किसान महापंचायतमध्येच व्यासपीठावर जाहीर केले. माजी पत्रकार आणि सिनेनिर्माते विनोद कापरी यांनी ट्विट करुन रक्षित यांच्याबद्दलची माहिती दिली आहे. रक्षीत यांना १२ लाख रुपये वर्षाचे पॅकेज आहे. त्यांना वडील नाहीत आणि घरातील ते एकमेव कमावते सदस्य अशूनही त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या कव्हरेजवरुन नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. रक्षित यांच्यासारखेच दाडस आता संपादक आणि वृत्तनिदेकांनी दाखवले असते तर बरे झाले असते असे त्यांनी म्हटले आहे.

शेतकरी आंदोलना आता देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे. काही वृत्तवाहिन्यांमधून आपल्या रिपोर्टर्सवर शेतकरी आंदोलन कव्हर करताना विशिष्ट स्वरुपाच्या बातम्याच दाखवण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप होत होता, पण आता रक्षित सिंग यांच्या राजीनाम्याने या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Tags:    

Similar News