इंग्लंड देशातील लंडन शहरात असणाऱ्या स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. (SOAS) या विद्यापीठात लातूर येथील विद्यार्थी अभिषेक भोसले पीएचडी करत आहे. गेल्या वर्षभरापासून ते इंग्लंड शहरात शिक्षण घेत असून या विद्यापीठात असणाऱ्या आंबेडकर सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. या सोसायटीवर जगभरातील विविध देशातील सदस्य असून या सोसायटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील पहिलाच व्यक्ती अभिषक भोसले असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जगभरातील आंबेडकरवादी संघटनांकडून विशेष कौतुक होत आहे.
मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना त्यांनी सांगितले की,मला सांगण्यास आनंद होतेय की, लंडनमधील SOAS विद्यापीठातील आंबेडकर सोसायटीचा 'प्रेसिंडेंट' म्हणून माझी निवड झाली आहे. २०२४ ते २०२५ या कालावधीसाठी ही निवड आहे.
हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रावादातून निर्माण झालेले प्रश्न हे फक्त आता भारतापुरते मर्यादित राहिले नाहीत,तर ते जागतिक बनले आहेत. लंडनमध्ये त्यांचा प्रभाव आहेच पण काही महिन्यांपूर्वी मी अमस्टरडॅममध्ये होतो, तिथल्या रस्त्यावर सुरू असलेल्या छोट्याश्या मिरवणुकीने मला याची प्रकर्षाने जाणिव करून दिली. हिंदुत्वाची मुळं ब्राह्यणी व्यवस्थेत आहेत हे वारंवार बोलण्याची गरज आहे आणि त्या बाह्रमणी हिंदू व्यवस्थेचे सर्वात व्यापक आणि मुलभूत क्रिटिक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं.
जेव्हा हिंदुत्वाचा प्रोजेक्ट ग्लोबल बनला आहे. तेव्हा त्याची उकल होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, समतेचे, न्यायाचे तत्वज्ञान जागतिक विद्यापीठात पोहचले पाहिजे. ते तिथल्या चर्चा विश्वाचा भाग असले पाहिजे, त्यातून जागतिक समता, न्याय, शोषणाविरोधातील सॉलिडॅरिटी उभ्या राहिल्या पाहिजेत या विचाराने माझ्या लंडनमधील विद्यापीठात आंबेडकर सोसायटी चालविली जाते. त्यात जातीअंताच्या अनुषंगाने मुलभूत चर्चा आणि कार्यक्रम तर होतातच पण त्यापुढे जाऊन हिंदुत्वाची चिकित्सा करण्याचाही प्रयत्न केला जातोय. मागील वर्षी बीबीसीने तयार केलेल्या ' India : The Modi Question' या माहितीपटाचे स्क्रिनिंग लंडनस्थित India Labor Solidairty समूहाच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर सोसायटीने केले होते. सोबतच समकालिन अभ्यासक, कार्यकर्त्यांची व्याख्याने आयोजित सोसायटी तर्फे आयोजित केली जातात.
ही सोसायटी लंडनमधून जरी आम्ही चालवत असलो तरी भारत होत असलेल्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, तसेच भारतात होत असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास किंवा भारतातील संस्थांच्या सहकार्याने नवीन कार्यक्रम आखण्यास किंवा त्यात सहभागी होण्यास आम्ही इच्छूक आहोत. असे शेवटी अभिषेक भोसले यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल भारतासह जगभरातील अनेक देशातील आंबेडकरवादी संघटनांकडून त्यांचे स्वागत होत आहे.