संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या तरुण मुलाची आत्महत्या

Update: 2022-01-20 11:00 GMT

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचे आहे असे सांगून वडिलांनी घर सोडले आणि दुसरीकडे मुलानं आईच्य़ा साडीने गळपास घेत जीवनयात्रा संपवली, ही वेदनादायी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. अमर माळी हा दयानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी होता, त्याचे 12 वीपर्यंत शिक्षण झाले होते.

बुधवारी सकाळी त्याने आपले वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली, पण एसटी संपात सहभागी झाल्याने पगार झालेला नाही, त्यामुळे पैसे कुठून देऊ असे उत्तर त्याच्या वडिलांनी दिले. त्यानंतर त्याचे वडील एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी निघून गेले. अमरदेखील घराबाहेर गेला,पण दुपारी घरी परतल्यानंतर तो न जेवता त्याच्या खोलीत आराम करतो असे सांगून गेला होता. पण बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अमरच्या भावाने खिडकीतून पाहिले असता अमरने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगिले. अमर 12 सायन्स झाला होता, तो अभ्यासात हुशार होता पण त्याने असे का केले ते कळत नाही असे त्याचे नातेवाईक, मित्र म्हणत आहेत.

Tags:    

Similar News