नवी मुंबईत अनोखा लग्न सोहळा...लग्न समारंभ पाहण्यासाठी एकच गर्दी

आज पर्यंत तुम्ही-आम्ही सर्वांनी अनेक लग्न समारंभ पाहिले असतील, मात्र नवी मुंबईत एक अनोखा लग्नसोहळा पार पडला. नेमका हा लग्न सोहळा कुणाचा होता आणि या लग्न सोहळ्याला नागरिकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी का केली होती. वाचा आमची विशेष बातमी...;

Update: 2023-01-25 07:54 GMT


तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल की, ही काय बातमी आहे. तर ही सुद्धा एक बातमी आहे. तुम्ही कधी कुत्रा आणि कुत्रीचे लग्न बघितले आहे का? नवी मुंबईतील सानपाडा येथे कुत्रा आणि कुत्रीचा अनोखा लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यामध्ये कुत्रीचे नाव रिया असे होते. तर रिओ असे कुत्र्याचे नाव होते. ज्या पद्धतीने दोन कुटुंबामध्ये लग्न सोहळा पार पडतो, अगदी तसाच लग्न सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही परिवाराकडून मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात लग्न समारंभ पार पडला. रिया आणि रिओ चा हा अनोखा लग्न समारंभ पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती.

आपण विविध प्रकरचे लग्न सोहळे पाहिले असतील मात्र हा अनोखा लग्न सोहळा पाहण्यासाठी नवीमुंबईकर एकत्र आले होते. त्यांनी सुद्धा या लग्न सोहळ्याचा हा मनमुराद आनंद घेतला आणि रिया व रिओ यांना शुभेच्छा दिल्या. याअगोदर आकाशात, जमिनीवर, पाण्यावर, पाण्याच्या खाली, हवेमध्ये लग्न सोहळे पार पडले आहेत. तर विमानात सुद्धा अनेक लग्न सोहळे पार पडले आहेत. मात्र रिया आणि रिओ चा हा एक अनोखा आणि वेगळा लग्न सोहळा पार पडला. त्याला नागरिकांनी सुद्धा भरभरुन दाद दिली. यापुढे असे लग्न सोहळे पार पडले तर कुणाला आश्चर्य वाटायला नको.

Tags:    

Similar News