गेल्या वर्षभरात जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये एकूण 171 दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या वर्षभरात जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये एकूण 171 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली;

Update: 2022-01-01 02:50 GMT

श्रीनगर // गेल्या वर्षभरात जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये एकूण 171 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, वर्ष 2021मध्ये एकूण 171 दहशतवादी चकमकीमध्ये ठार झाले. त्यापैकी 19 दहशतवादी हे पाकिस्तानी तर 152 स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. 2020 ला जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये एकूण 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2021 ला एकूण 34 नागरिकांचा मृत्यू झाला.

2021 मध्ये जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय जवांना मोठे यश मिळाले आहे. जवळपास सर्वच दहशतवादी गंटांच्या मोहरक्यांचा खात्मा या वर्षात करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. त्यात उत्तर काश्मीरमध्ये 65, मध्य काश्मीरमध्ये 16 आणि दक्षिण काश्मीरमध्ये 87 असे एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. 13 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पोलिसांचे दहशतवाद्यांकडे बारीक लक्ष असून, राज्यातील दहशतवादी कारवायांना आळा घालण्याला आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान , जम्मू -काश्मीरमध्ये आतापर्यंत अमली पदार्थ तस्करी प्रकरणात 815 एफआयआर दाखल करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली, यासंदर्भात एकूण 1465 जणांना अटक करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

Tags:    

Similar News