नवी मुंबई पोलिसांचे एक पाऊल पुढे, ११२ नंबरच्या मदत कक्षाची स्थापना

नवी मुंबई पोलीस दलातर्फे नवी मुंबईत “डायल-११२” ही प्रभावी आपत्कालीन सेवेची आज सुरवात करण्यात आली. नागरिकांना या सेवेची विस्तृत माहिती मिळावी आणि समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मार्फत ‘डायल ११२ प्रमोशन’ करण्यात आले.;

Update: 2023-02-13 12:15 GMT

नवी मुंबई पोलिसांनी ११२ क्रमांक मदत कक्षाची स्थापना केली असून घटनास्थळावरून ११२ या क्रमांकावर संपर्क केल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन पीडित व्यक्तीची मदत करणार आहेत. पूर्वी १०० नंबर वर फोन करून घटनेची माहिती दिली जात होती. आता हीच माहिती ११२ नंबर वर फोन करून दिली जाऊ शकते. यात एक विशिष्ट कार्यप्रणाली ॲक्टिव करण्यात आली असून आपण केलेल्या फोनचे लोकेशन यात दाखवले जाणार आहे. ज्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यात मदत होणार आहे. या मदत क्रमांकाची सुरुवात नवी मुंबई येथून करण्यात आली असून याचा विस्तार संपूर्ण देशभरात होणार आहे. त्यामुळे आपण देशातल्या कोणत्याही ठिकाणावरून ११२ या नंबरवर फोन करून मदत मागू शकणार आहात. त्या त्या ठिकाणांच्या मदत कक्षाची मदत आपणास त्यावेळी मिळणार आहे. मात्र एक पाऊल पुढे जात नवी मुंबई पोलिसांनी याची विश्वास दर्शक सुरुवात केली आहे. या मदत संपर्क क्रमांकाचे उद्घाटन राज्याचे कायदा सुव्यवस्था अप्पर पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी केले.


 



नागरिकांना “डायल-११२” वर व्हाईस कॉल, एसओएस, एसएमएस, ई-मेल, वेब विनंती आणि पॅनिक बटणाद्वारे मदतीची विनंती केल्यास तात्काळ विनाविलंब महाराष्ट्र पोलिसांकडून वर्षामध्ये ३६५ दिवस आणि २४ तास मदत पुरवण्यात येणार आहे. “डायल-११२” या प्रभावी सेवेचे माहिती नवी मुंबईतील विविध शाळेतील ३०० विद्यार्थी, ३५० सुजाण नागरिक असे एकूण ६५० नवी मुंबईकरांनी याची आजच्या दिवसात माहिती करुन घेतली. “डायल-११२” विषयी प्रसार व जनजागृती व्हावी याकरिता ५ सुसज्ज वाहने तयार करण्यात आली आहेत. त्यावर “डायल-११२” चे पोस्टर लावण्यात आले असून ३ दिवसही वाहने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत नवी मुंबईच्या विविध भागात फिरवण्यात येणार आहेत. मुख्यत्वे करुन ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होते अशा ठिकाणी गस्त करुन प्रसार व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच मुख्य ठिकाणी ४१ हजार ५०० पोस्टर्स लावून देखील लोकांमध्ये “डायल-११२” या क्रमांकाविषयी प्रसार व जनजागृती करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मदत हवी असल्यास “डायल-११२” वर कॉल करावा. 

Tags:    

Similar News