अलिबागेत लाल बावट्याचे वादळ घोंगावले

अलिबागमध्ये शेकापने महाविकास आघाडीसोबत राहत उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी शेकापने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं…;

Update: 2024-10-23 04:31 GMT

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आज भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अलिबागमध्ये शेकापने महाविकास आघाडीसोबत राहत उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी शेकापने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं…

जयंत पाटील यांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला, परिसरात संपूर्ण लाल बावट्याचे वादळ आल्याचे चित्र उभे राहिले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत जयंत पाटील यांनी शेकापचा लढावू व क्रांतिकारी इतिहास सांगितला, ज्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात नवी प्रेरणा जागी झाली.

या शक्तिप्रदर्शनात अलिबाग मतदारसंघातून चित्रलेखा पाटील, पनवेलमधून बाळाराम पाटील, उरणमधून प्रीतम म्हात्रे, आणि पेणमधून अतुल म्हात्रे यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे जल्लोष केला.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाने शेकापच्या कार्यकर्त्यांत नवा उत्साह संचारला आहे. शेकापने महाविकास आघाडीसोबत राहत उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी शेकापने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं…

Tags:    

Similar News