दिल्ली मध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या

दिल्लीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नराधम आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले.;

Update: 2021-08-03 06:05 GMT

दिल्लीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नराधम आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले. आणि संबधित मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती तिच्या कुटुंबाला दिली. सोबतच याबाबत पोलिसाना माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना या नराधमांनी सांगितलं. दिल्लीच्या कंटोनमेंट भागातील नांगल गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी याबाबत माहीती देतांना म्हटलं आहे की, पीडित मुलगी रविवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास स्मशानभूमीत असणाऱ्या कूलरमधून थंड पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ होऊन देखील मुलगी घरी परतली नाही.दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्मशानमभूमीतील पुजारी आणि इतरांनी फोन करुन तिच्या घरच्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना मुलीचा मृतदेह दाखवण्यात आला. दरम्यान वॉटर कूलरमधून पाणी घेत असताना तिला विजेचा धक्का लागला आणि त्यात तिचा मृत्यू झाला असं तिच्या घरच्यांना सांगण्यात आलं. सोबतच पोलिसांना याची माहिती देऊ नका असं आरोपींनी पीडितेच्या आईला सांगितले. पोलिसांत प्रकरण गेलं तर तिचे शवविच्छेदन करतांना तिच्या अवयवांची चोरी होईल असं या आरोपींनी म्हटलं. आणि तिला भीती घालण्यात आली. मात्र, घरच्यांना न सांगता पीडितेवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याने याबाबत संशय वाढला. सोबतच मुलीच्या हातावर जखमा होत्या आणि तिचे ओठ निळे पडले होते असं पीडितेच्या आईने सांगितले शिवाय घरच्यांची परवानगी शिवाय मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पीडितेच्या आईने याबाबत पीडितेच्या वडिलांना याबाबत फोनवरून माहिती दिल्यानंतर जवळपास 200 लोक स्मशानभूमीजवळ जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनेबाबत माहीती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची बातमी दिले आहे.

Tags:    

Similar News