संगमनेरच्या साकुर येथील बिरोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर साकुरच्या बिरोबा महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. पुणे ,नाशिक ,अहमदनगर तसेच मुंबई-ठाणे जिल्ह्यातून मोठया संख्येने बिरोबा मंदिरात दाखल झाले.;

Update: 2021-08-22 08:47 GMT

संगमनेर तालुक्यातील, साकुर पठार भागातील ,साकुर गावचे देवस्थान असलेल्या बिरोबा महाराज मंदिरात श्रावण महिन्यात बिरोबा महाराजांची यात्रा महोत्सव असतो. मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा महोत्सव बंद आहे. सोबतच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर देखील भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले.

यंदा देखील नागपंचमी व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर होणार यात्रा महोत्सव बंद ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. असे असताना आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बिरोबा महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. पुणे ,नाशिक ,अहमदनगर तसेच मुंबई-ठाणे जिल्ह्यातून मोठया संख्येने बिरोबा मंदिरात दाखल झाले.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने मंदिर बंद ठेवले आहे, तरी देखील नागरिकांची मंदिर परिसरात गर्दी होताना दिसत आहेत. मंदिर बंद असल्याने भाविक 10 फूट अंतरावरून मुख दर्शन घेत आहेत.

दरम्यान बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टकडून भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे.

Tags:    

Similar News