बोगस कागदपत्रांच्या आधारे नांदेड येथील शेतकऱ्याचा विमा चक्क बीड जिल्ह्यात काढल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्धापूर येथील शेतकरी संभाजी माटे यांच्या शेत जमीनीचा पिकविमा बनावट कागदपत्रांच्या आधारे बीड जिल्ह्यातील परमेश्वर बाळासाहेब सानप या शेतकऱ्यांने काढलाय. हा पिक विमा बनावट कागदपत्रे तयार करून काढल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी पीडित शेतकऱ्याने प्रशासनाकडे लेखी तक्रार देवून केली आहे.
या वर्षापासुन शासनाने केवळ एक रूपयामध्ये पिकविमा योजना लागू केली. त्यामुळे विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परंतू या योजनेचा दुरुपयोग होत असल्याचे अनेक गंभीर प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संभाजी माटे यांच्याबाबतीत देखील घडला आहे.