धुळे// चारा आणण्याचे आमिष दाखवत 71 वर्षाच्या नराधमाने अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीस मोहाडी पोलिसांनी अटक केली असून त्याने वापरलेली सायकल देखिल ताब्यात घेण्यात आली आहे.
दीपोत्सवाच्या धामधुमीत अकरा वर्षीय पीडित मुलगी दुपारी एक ते सायंकाळी सहाच्या दरम्यान बोकडासाठी चारा घेऊन येते असे सांगून घरातून निघाली, यावेळी संशयित आरोपी शांताराम अहिरे याने रेल्वे पट्ट्याजवळ चारा तोडून देण्याचे आमिष दाखविले, त्यामुळे अल्पवयीन पीडिता त्याच्यासोबत निघाली शांताराम अहिरे ने तिला सायकलवर बसून सावळदे शिवारातील शेतात नेले तेथे पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार करत याबाबत कुणाला काही सांगितल्यास कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अल्पवयीन पीडिता घाबरून गेली तिने त्या दिवशी घटनेबाबत तीने कुठलीच वाच्यता केली नाही.
सोमवारी अल्पवयीन पीडितेच्या पोटात दुखू लागले याबाबत तिने तिच्या आईला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर घाबरलेल्या तिच्या आईने सासू व अन्य नातेवाईकांशी चर्चा करत सोमवारी रात्री उशिरा या घटनेबाबत मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी संशयित शांताराम शिवराम अहिरे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेत त्याने वापरलेली सायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे.