Mumbai Fire : मुंबईत अग्नीकांड, 7 जणांचा मृत्यू

मुंबईतील गोरेगावच्या उन्नत नगरमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.;

Update: 2023-10-06 03:54 GMT

मुंबईतील गोरेगाव येथील उन्नत नगरच्या जय भवानी सोसायटीला भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्याबरोबरच 40 हून अधिक लोकांना मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले.

गोरेगावच्या उन्नत नगरमधील एसआरएच्या जय भवानी सोसायटीतील जी+7 इमारतीला आग लागली. या आगीत 30 जण जखमी झाले असून 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच 31 पैकी 14 जण गंभीर जखमी असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

या आगीत 40 ते 45 जण गुदमरले असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र सध्या अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांमार्फत कुलींगचे काम सुरू आहे.

Tags:    

Similar News