आरटीओ वाहन निरीक्षकांविरुद्ध तब्बल 300 पानांचे दोषारोपपत्र

धुळे प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयातील आरटीओ निरीक्षकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण आणि धमकीचा मजकूर लिहिलेले पत्रक वाटल्या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 300 पानांचे दोषारोपत्र दाखल केले आहे.;

Update: 2021-07-29 13:29 GMT

धुळे : धुळे प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयातील आरटीओ निरीक्षकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण आणि धमकीचा मजकूर लिहिलेले पत्रक वाटल्या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी वाहन निरीक्षकांविरुद्ध 300 च्या वर पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात एका व्यक्तीने काही पत्रके टाकली होती. ही पत्रके कार्यालयातील खिडक्यांमधून प्रत्येक लिपिक , आरटीओ एजंट यांच्या कार्यालयात टाकण्यात आली होती. या पत्रकात एका आरटीओ निरीक्षकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण आणि धमकीचा मजकूर होता. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्हीचे चित्रण तपासले असता पोलिसांना एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून पत्रके वाटत असतांना दिसून आली.

याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची परिवहन मंत्री अनिल परब यांनी गांभीर्याने दखल घेत, या प्रकरणी त्यांनी पोलिस यंत्रणेला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी या तपासाला वेग दिला.

अखेर या प्रकरणात संशयित आरोपी राहुल पाटील आणि गजेंद्र पाटील या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले. याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या संशयितांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र पाटील यांच्या चुलत भावाच्या नावाने असलेली एक कार जप्त केली आहे. या वाहनाचा क्रमांक निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मोबाईलशी जोडलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून सुमारे तीनशे पानांचे दोषारोपपत्र करून ते न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाने धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags:    

Similar News