"सिर्फ एक बंदा काफी है" शरद पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे.अजित पवार यांची वांद्रा येथे बैठक असुन शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण येथे बैठकीचे आय़ोजन करण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये विभाजन झाले असले तरी निष्ठावंत कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणुन शरद पवार यांच्यासोबत नेहमी राहु. जे काही राजकारणात सुरु आहे ते जनतेला फसवणुकीचे काम सुरु आहे. राजकारणातील चाणक्य हे फक्त शरद पवार आहेत.
जे गेले आहेत ते आज ना उद्या पुन्हा घरवापसी करतील.आमचे दैवत 'शरद पवार' हेच असतील. शरद पवार यांच्या जे कोणी नादाला लागेल ते पुन्हा निवडुक येणार नाही. खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आमचा पाठिंबा राहील. असे वाय. बी. सेंटर वर येणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.