"देवेंद्रजी जरा शर्म करो"- संजय राऊत
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या याच्यावर INS विक्रांत प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांना पाठीशी घालत असल्यामुळे देवेंद्रजी जरा शर्म करो, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची लाज काढली.
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र संजय राऊत यांनी INS विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी गोळा केलेले पैसे लाटल्याचा आरोप केला. त्यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Sanjay Raut target to Devendra fadanvis) यांच्यावर निशाणा साधत लाज काढली. (Kirit Somaiya Vs Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले या देशात एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला तरी त्याला तुरूंगात टाकण्याची तरतुद आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी फक्त भ्रष्टाचारच नाही तर पाकिस्तान आणि बांग्लादेश वेगळे करण्यासाठी महत्वाच्या ठरलेल्य INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली पैसा गोळा करून लाटला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी देशभावनेचा लिलाव केला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut Allegation on Kirit somaiya)
मी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या (Niel Somaiya) यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले. पण दुसऱ्यांना देशप्रेम, राष्ट्रवाद, हिंदूत्व शिकवणारे देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) सोमय्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना लाज वाटायला हवी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाऱ्यांना जोड्याने मारण्याऐवजी किरीट सोमय्यासारख्या देशद्रोही माणसाची वकीली करत आहेत. ते पाहुन हेडगेवार, गोळवळकर , शामा प्रसाद मुखर्जी यांना काय वाटले असेल असे संजय राऊत म्हणाले. तसेच या देशासाठी तुमचे योगदान काय? या बलिदानाचा लिलाव करून पैसे कमावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या यांच्याविरोधात ईडीच्या (ED) कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. तसेच महाराष्ट्राच्या विरोधात केलेले कारस्थान एकवेळ खपवून घेतले जाईल पण देशविरोधी कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेने राज्यसभा आणि लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. तसेच शिवसेना राज्यातही किरीट सोमय्यांच्या अटकेसाठी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. (Shivsena will aggressive against Kirit Somaiya)
संजय राऊत यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांची अक्कल काढल्याने सुरू असलेला भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.