प्रविण दरेकर हाजीर हो.., मुंबई पोलिसांची नोटीस
गेल्या काही दिवसांपासून प्रविण दरेकर यांच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीत. त्यातच मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अडचणी वाढल्या असतानाच आता मुंबई पोलिसांनी उद्या (4 एप्रिल) रोजी हजर होण्यास सांगितले आहे.;
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे मुंबई जिल्हा बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेची टांगती तलवार असताना आता आपने प्रविण दरेकर यांच्या जवळचा फास आवळायला सुरूवात केली आहे. त्यातच प्रविण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून मुंबै बँकेच्या निवडणूकीत संचालक पदासाठी अर्ज करून फसवणूक केल्याचा आरोप
अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रविण दरेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. तर मुंबै जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रविण दरेकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी आम आदमी पक्षाने केलेल्या आरोपांमुळे प्रविण दरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबै जिल्हा बँकेत प्रविण दरेकर यांनी मजूर आणि नागरी सहकारी अशा दोन गटातून निवडणूकीसाठी अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र त्यांच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवण्यावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला. तर प्रविण दरेकर हे 1997 पासून मजूर प्रवर्गातून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षांपासून बँकेच्या ठेविदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आपचे धनंजय शिंदे यांनी केला. तसेच मुंबै बँकेत सहकार कायद्याचे उल्लंघन करून घोटाळा केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे दरेकर अडचणीत आले. मात्र त्यातच आता मुंबई पोलिसांनी प्रविण दरेकर यांना नोटीस पाठवून हजर होण्याचे आदेश दिले आहेत.