अनेक गृहिणी महिलांमध्ये वेगवेगळ्या कला असतात. पण त्यांना या कलांना व्यवसायात रूपांतर करण्याची संधी मिळत नाही. बीडमधील शैलाताई वारे यांनी आपल्या घरी शिलाई काम करण्याचा व्यवसाय सुरू केला. मग त्यानंतर डिजाईनचे ब्लाऊज, साधे ब्लाऊज, पंजाबी ड्रेस, त्याचबरोबर वेगवेगळ्या साड्यांना पिको फॉल करणे अशा अनेक कामे आता त्या करत आहेत. घर काम झाल्यानंतर जो फावला वेळ मिळतो त्यामध्ये त्या ही सर्व काम करतात व आपल्या संपूर्ण घराचा उदरनिर्वाह या व्यवसायावर करतात..