पहिल्याच प्रयत्नात केली UPSC पार , अन् बनली IPS अधिकारी

Update: 2023-11-28 13:00 GMT

श्रम आणि जिद्द जर असेल तर आपल्यासाठी काहीच अशक्य नाही हे अगदी बरोबर आहे. UPSC ही परीक्षा खूप कठीण परीक्षा मानली जाते. विद्यार्थीही परीक्षा अनेक वेळा देऊन सुद्धा त्यांना लगेच यश मिळत नाही. मात्र ओडिशाची रहिवासी काम्या मिश्रा हिने सर्व युवांसाठी एक उदाहरण घालून दिल आहे. काम्या मिश्रा हिने पहिल्याच प्रयत्नात UPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवले आहे.

ओडिशातील काम्या मिश्रा ही लहानपणा पासुनच हुशार विद्यार्थीनी होती. बारावीच्या परीक्षेत काम्याला ९८.६ टक्के होते. काम्याने तिचे माध्यमिक शिक्षण केआयआयटी इंटरनॅशनल स्कूल, ओडिशातून पूर्ण केले आहे. त्यानंतर, तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात असताना ती यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. काम्या मिश्राने २०१९ मध्ये पहिल्यांदाच यूपीएसी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती या परीक्षेत पास झाली. काम्याने १७२ व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली.

काम्याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी भारतीय पोलीस सेवा (IPS) पद मिळवले. आयपीएस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्याकडे सुरुवातीला हिमाचल केडरची जबाबदारी सोपवण्यात आली. नंतर तिची बिहार केडरमध्ये बदली करण्यात आली.

काम्या मिश्राचा हा प्रवास अतिशय खडतर होता हे तिला माहित होत मात्र तिने हार मानली नाही, तर त्याला जिद्दीने सामोरी गेली. काम्याने या परिक्षेचे वेळापत्रक बनवले. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी तिने एक विशिष्ठ वेळ ठरवून घेतली. शिवाय मुख्य़ परीक्षेच्या उत्तर लेखनाचाही तिने खूप सराव केला होता. सरावा शिवाय हे अशक्य आहे असे काम्याचे मत आहे.

Tags:    

Similar News