स्वातंत्र्य दिवसाच्या मुहूर्तावर लाडक्या बहीणीच्या खात्यावर रक्कम जमा, महिला व बाल विकास विभाग २४ तास कार्यरत - आदिती तटकरे
Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत.;
Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत.
यापूर्वी या योजनेतील एक रुपया ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. त्यानंतर आता आणखी एका टप्प्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनाही पैसे लवकर जमा होतील. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3 हजार रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी या नंतर अर्ज भरले आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय.
बहिणीचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत असे म्हणत आदिती तटकरे यांनी X या सोशल मीडिया माध्यमांवर पोस्ट करत लिहिलं आहे
- काही जिल्हे आणि त्यांचे अर्जाची संख्या :-
- पुणे 9,73,063
- नाशिक 7,37,708
- अहिल्यानगर 7,08,948
- कोल्हापूर 6,96,073
- सोलापूर 6,14,962
- सांगली 4,59,836
- छत्रपती संभाजीनगर 5,41,554
- सातारा 5,30,828
* रायगड 3,85,886. पुण्यात सर्वाधिक तर सिंधुदुर्ग सर्वात कमी अर्ज आले आहेत.