"मी माझा चांगला सहकारी आणि मित्र गमावला" - अजित पवार

Update: 2024-10-12 18:48 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आपल्या भावना व्यक्त करताना या घटनेला अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह म्हटले. त्यांनी सांगितले की, “या भ्याड हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचे निधन झाल्याने मला मोठा धक्का बसला आहे. मी माझा चांगला सहकारी आणि मित्र गमावला आहे.”

पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत बाबासिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी हल्ल्याची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवार मुंबईकडे रवाना; तर आशिष शेलार रुग्णालायत दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, SRA प्रकल्पाच्या वादात हा गोळीबार असल्याच पुढे येत आहे. गोळीबारा दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली होती. याशिवाय त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल झाले आहेत. माहिती पुढे येताच बाबा सिद्दीकी यांचे मित्र अभिनेता संजय दत्त,भाजप नेते आशिष शेलार रुग्णालयात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही काही वेळात लिलावती रुग्णालयात दाखल होतील. रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे.

“बाबा सिद्दीकी यांचे निधन म्हणजे अल्पसंख्याक समाजासाठी लढणाऱ्या आणि सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणाऱ्या एक चांगला नेत्याच आम्ही गमावला आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक मोठं नुकसान आहे,” असे पवार म्हणाले.

अजित पवार यांनी झिशान सिद्दीकी आणि सिद्दीकी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन कुटुंबियांच्या दु:खात सामील असल्याचे सांगितले आहे. या घटनेने राज्यात आणि राजकीय क्षेत्रात चिंतेच वातावण निर्माण झालं आहे, आणि आता या घटनेच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News