Dhananjay Munde: यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

Dhananjay Munde: यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे;

Update: 2021-01-22 03:53 GMT

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विराधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. सदर महिलेने निवेदन देऊन हे आमचे घरगुती प्रकरण असून थोडा वाद झाल्यामुळे ही तक्रार केली होती. पण या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे मी बलात्काराची तक्रार मागे घेत असल्याचं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आता संबंधित महिलेने डी.एन पोलीस ठाण्यातील धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली आहे.

"या महिलेने आपल्या जबाबात सांगितलं की, गेल्या काही वेळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती.

दरम्यान जर एखाद्या महिलेने तक्रार दाखल केली असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या महिलेची दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा लागतो. मग हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कलमानुसार आरोपीवर कारवाई होत असते. त्यामुळे पीडित महिलेच्या गंभीर आरोपानुसार गुन्हा दाखल होऊन धनंजय मुंडेंवर कारवाई झाली असती. पण आता हा गुन्हा दाखल झाला नाही आहे. कारण पीडित महिलेने धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे

Tags:    

Similar News