आदिती तटकरे यांनी 15-20 आमदारात नाव असावं म्हणून केली होती प्रार्थना

घरातून राजकीय वारसा असला तरी आपल्याला कर्तृत्व सिध्द करावं लागतं. पण 2019 च्या निवडणूकीत अगदी प्रतिकूल परिस्थिती असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांकडून म्हटलं जात होतं. पण तरीही 15-20 आमदारांमध्ये आपण असावं, अशी प्रार्थना आदिती तटकरे का करायच्या? जाणून घेण्यासाठी वाचा....

Update: 2023-05-20 11:27 GMT

घरात राजकीय वारसा होता. मात्र कर्तृत्व स्वतःलाच सिध्द करावं लागतं, हा विचार मनात घेऊन आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी राजकीय प्रवास सुरु केला. पण 2017 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्यानंतर आदिती तटकरे काम करत होत्या. त्यातूनच आदिती तटकरे यांना पुढे 2019 मध्ये विधानसभेसाठी संधी मिळाली. पण वातावरण अगदी विरोधात होतं. अनेक राजकीय विश्लेषक याबाबत प्रतिकूल मत व्यक्त करत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अवघे 15-20 आमदार निवडून येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे माझा या 15-20 आमदारांमध्ये समावेश असावा, असं नेहमी वाटायचं. म्हणून 15-20 आमदारांमध्ये नाव यावं, म्हणून मी प्रार्थना करायचे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

पण 2019 मध्ये काय घडलं? हे सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर मला विविध खात्यांचे मंत्रीपद भुषवता आल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.

Full View

Tags:    

Similar News