दिल्लीतील भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी जवाहरलाल विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे ही मागणी त्यांनी जेएनयूतील एका कार्यक्रमातच केली होती. त्यांनी कार्यक्रमात सहभागी लोकांना संबोधित करताना म्हटले होते की, सर्व शांततेत होवो, यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. बॉम्बस्फोट होऊ नयेत. मी तर म्हणतो की, जेएनयूचे नाव बदलून ते एमएनयू केले पाहिजे. मोदींच्या नावानेही काही तरी असले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.
मात्र, खासदार हंसराज हंस यांनी केलेले वक्तव्य आणि गेल्या काही वर्षात जेएनयू मध्ये घडलेली सर्व प्रकरण पाहता JNU चं MNU का करायचं आहे आणि कोणाला करायचं आहे असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याच संदर्भात प्राध्यापक राम पुनियानी यांचे विश्लेषण पाहा... JNU चं MNU का करायचंय?