गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये एक चांगली उफाळी आपल्याला पाहायला मिळाली. शेअर मार्केट 1900 अंकांनी वधारलं होतं त्यामुळे गुंतवणूकदारांना गेल्या आठवड्यात चांगला परतावा मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केट मधील पडझड काही थांबत नव्हती परंतु गेल्या आठवड्यातील वधारलेल्या अंकामुळे शेअर मार्केट 38 हजारांच्या पार गेले. हीच स्थिती या आठवड्यात ही असणार आहे. आज शेअर मार्केट 38 हजार 544 अंकांनी खुला झालेला आहे बाजार चालू होत असताना देखील अंकात वाढ झाली त्यामुळे हे एक सूचक चिन्ह आहे की बाजार या आठवड्यात सुद्धा थोड्या काही प्रमाणात वाढू शकते. आज निफ्टी 11,500 च्या आकड्यावर खुला झालेला असुन त्याची स्थिती देखील या आठवड्यात स्थिरावण्याची चिन्ह आहेत.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2250066125116783/?t=1