Eid च्या निमीत्ताने बोकडांचे दर घसरले, व्यापाऱ्यांच्या पदरी निराशा

ईदच्या निमीत्ताने मुंबईतील देवनार बाजारात मोठ्या प्रमाणात बोकडांची आवक झाली आहे. मात्र यंदा व्यापाऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे चित्र आहे. पण त्यासाठी नेमकं कारण काय? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2023-06-28 17:30 GMT

ईदच्या निमीत्ताने मुबईमधील देवनारमध्ये बोकडांचा बाजार भरतो. यावेळी देवनारमध्ये महाराष्ट्रभरासह इतर राज्यातूनही व्यापारी आले होते. मात्र यंदा व्यापाऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे चित्र देवनार बोकडांच्या मार्केटमध्ये पहायला मिळाले.

आम्ही राजस्थानमधून आलो आहोत. मात्र यंदा देवनार मार्केटमधील बोकडांच्या बाजारात मोठी मंदी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आम्हाला मोठा तोटा झाल्याचं राजस्थानमधून आलेल्या व्यापाऱ्याने सांगितले.

देवनार बाजारात आम्ही दरवर्षी येतो. पण यंदा पावसामुळे बाजारात मोठी मंदी आहे. चाळीस हजारांचे बोकड अवघ्या तीस हजारात विकावे लागत आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका बसला आहे, असं उत्तर प्रदेश येथून आलेल्या जमील सय्यद यांनी सांगितले.

आम्ही 100 बोकड आणले होते. मात्र पावसाने यंदा आमचा धंदा बसला. आमच्यावर रडण्याची वेळ आल्याचे भोपाळहून आलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

Full View

Similar News