सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्तींसह बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. मात्र या अनेक ठिकाणी या अटीशर्तींचे पालन होतांना दिसत नाही. त्यातच शर्यतीदरम्यान क्रुरतेची परिसीमा गाठल्याचे दिसून येत आहे.
बीडमध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी बीडकरांनी तुफान गर्दी केली. याच गर्दीत बैल उधळल्याने दोन शाळकरी मुलं गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या तळेगाव शिवारात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. हीच शर्यत पाहण्यासाठी सकाळपासूनच बीडकरांची तुफान गर्दी झाली. ही शर्यत सुरू असतानाच एक बैलगाडा थेट गर्दीत घुसला आणि यामध्ये दोन शाळकरी मुलं बैलगाड्या खाली आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पशूंना क्रुरपणे वागवले जात असल्याने अटी शर्ती घालून दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही बैलगाडा शर्यतीत पशूंना क्रुरपणे वागवल्याने बैल थेट गर्दीत घुसत आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यतीत सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे.