Max Maharashtra Impact मॅक्स महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश ऊसतोड महिलांना मिळाले ओळखपत्र !

बीड (Beed)जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.ऊसतोड मजुरांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी मॅक्स महाराष्ट्रने बातमीतून केली होती या मागणीला यश आले असून ऊसतोड मजुरांना ओळखपत्र देण्यास सुरवात झाली आहे.;

Update: 2023-04-23 04:17 GMT

बीड (Beed)जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.ऊसतोड मजुरांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी मॅक्स महाराष्ट्रने बातमीतून केली होती या मागणीला यश आले असून ऊसतोड मजुरांना ओळखपत्र देण्यास सुरवात झाली आहे.




 


बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या समस्यांविषयी मॅक्स महाराष्ट्रने सप्टेंबर 2022 मध्ये बातमी केली होती. त्या बातमीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी एक ॲप (sugarcane cutter rajister app)तयार केले होते. त्या ॲपमध्ये ऊसतोड कामगारांच्या नोंदणीला सुरुवात झाली. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्र ने ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहाच्या मागणीसाठी अनेक वेळा बातमी केली. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना मॅक्स महाराष्ट्र ने एका कार्यक्रमादरम्यान ऊसतोड कामगारांच्या ओळखपत्राविषयी प्रश्न विचारला होता. दखल घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगार महिला व पुरुषांना ओळखपत्राचे वाटप केले. या ओळखपत्रांमध्ये त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती असून त्या आधारे त्याला विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

ऊसतोड कामगारांच्या नोंदणीची का आहे गरज...?

जिल्ह्यातील ज्या महिलांची ऊसतोड (Ustod majur)कामगार महिला म्हणून नोंदणी झालेली नसेल या महिलांची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने बैठक बोलावली होती. नोंदणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये विविध कॅटेगिरी करता येईल. त्यांना कोणत्या योजना देता येतील याच्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना दिली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कामगारांच्या कुटुंबाला विमा लागू केला जाणार आहे.


Tags:    

Similar News