झेब्रो फाऊंडेशनचे संस्थापक आशिष गडकरी यांनी मूक बधिरांना सीआयएसएफ गोल्डन ज्युबली टी -20 क्रिकेट टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी व्यापीठ दिले. आनंद पसरवणे हेच झेब्रो फाऊंडेशनचे काम आहे आणि निराश झालेल्या मूक बधिरांना आशेचा किरण देण्याचे काम आम्ही करत राहू असे ते म्हणाले.
झेब्रो फाऊंडेशन आणि एमडीएल मुंबई या संघाचा सीआयएसएफ गोल्डन ज्युबली टी -20 क्रिकेट टूर्नामेंटमध्ये २७/११/२०१८ रोजी दुसरा सामना खेळवला गेला. आरसीएफएलचे कार्यकारी संचालक श्री अरुण नवाडे यावेळी उपस्थित होते. झेब्रो फाऊंडेशनने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
झबेरो फाऊंडेशनने २० षटकात ५ विकेट गमावून १३९ धावा केल्या. एमडीएल संघाची सुरुवात खराब झाली परंतु मधल्या फळीने चांगली फलंदाजी केली. झेब्रो फाऊंडेशनच्या किरण विरडेने उत्तम गोलंदाजी करत ४ मोठ्या विकेट घेतले. एमडीएल संघाने ११० धावांचा पाठलाग करत हरले. झेब्रो फाऊंडेशने २९ धावांनी सामना जिंकला. मॅन ऑफ मॅच श्री. किरण विरडे यांना मिळाले. ४ षटकात ४ बळी घेऊन २२ धावा केल्या.
https://youtu.be/iq433oiZGxM