भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या गाड्या मुंबई बाहेर रजिस्टर करून मुंबई महापालिकेच्या जकातीचं नुकसान केल्याचं दिसून येत आहे. मॅक्समहाराष्ट्रला मिळालेल्या माहितीनुसार कर वाचावा यासाठी किरीट सोमय्या यांनी आपल्या दोन्ही गाड्या मुंबईबाहे र म्हणजेच वसईला रजिस्टर केल्या. साधारणत: कर वाचवण्यासाठी अनेक जण असं करत असतात. मात्र सोमय्या यांनी दोन पैकी एक गाडी ज्या पत्त्यावर रजिस्टर केली आहे तो पत्ता उपलब्ध कागदपत्रांप्रमाणे किरीट सोमय्या यांचा दिसत नाही. तर दुसरा पत्ता निवडणूक प्रतिज्ञापत्राप्रमाणे किरीट सोमय्या यांच्या परिवाराचा आहे.
किरीट सोमय्या यांच्या २०१४ च्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांच्याकडे एमएच ०४ ईके ७०७० ही होंडा सिटी तसंच एमएच ०४ ईडब्ल्यू ७०७० ही शेवर्ले कार आहे. होंडा सिटी कार ही रिएल इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस, बिल्डींग नं ६, सर्व्हे नंबर ८४ या वसईच्या पत्त्यावर तर होंडा सिटी कार गाळा क्रमांक ११०, रियल इंडस्ट्रीयल इस्टेट-६ या पत्त्यावर रजिस्टर्ड आहे. विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने १८/६/१५ रोजी गाळा क्रमांक ११० हा ललिलावासाठी काढला. या संदर्भात वेबसाईट तसंच माध्यमांमध्ये जाहिरात ही काढण्यात आली होती. या जाहिरातीप्रमाणे हा गाळा मेसर्स नीत रायटिंग इन्स्ट्रूमेंटस अँड अदर्स या नावावर आहे. किरीट सोमय्या यांच्या २००४ पासूनच्या कुठल्याही प्रतिज्ञापत्रामध्ये हा गाळा किंवा मेसर्स नीत रायटिंग इन्स्ट्रूमेंटस सारख्या कंपनीचा किंवा फर्मचा उल्लेख नाहीय. किंवा ज्या अर्थी बँकेने या गाळ्याचा लिलाव पुकारला त्या अर्थी या गाळ्याचा असलेल्या कर्जाचा कुठलाही उल्लेख किरीट सोमय्या यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नाही.
किरीट सोमय्या यांच्यासारख्या प्रामाणिक खासदाराने आणि राजकीय नेत्याने आपल्या राहत्या घराच्या पत्त्यावर गाडी रजिस्टर्ड न करता वसईत का करावी? चुकीचा पत्ता का द्यावा? किंवा पत्ता बरोबर असेल तर त्या पत्त्याचा, फर्मचा, त्या फर्मशी काही व्यावसायिक संबंध असतीलच तर त्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख प्रतिज्ञापत्रामध्ये का टाळावा? मुंबई महापालिकेला गाड्यांच्या विक्रीवर कर मिळत असतो. हा कर चुकवण्यासाठी अनेक जण अशा मार्गांचा अवलंब करतात, हाच मार्ग किरीट सोमय्यांनी का अवलंबला हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.
वसईशी किरीट सोमय्या यांचं 'प्रेम' नक्की काय आहे याचे आणखीही पुरावे मॅक्समहाराष्ट्र कडे उपलब्ध आहेत.
यावरही लवकरच सविस्तर प्रकाश टाकण्यात येईल. तूर्तास किरीट सोमय्या प्रामाणिक राजकारण्याने मुंबई महापालिकेच्या कराचं नुकसान काकेलं याचा खुलासा केला पाहिजे.
किरीट सोमय्या यांनी २००९ मध्ये सादर केलेल प्रतिज्ञापत्र
[huge_it_slider id="2"]
किरीट सोमय्या यांनी २०१४ मध्ये सादर केलेल प्रतिज्ञापत्र
[huge_it_slider id="3"]