महिला दिनाचं औचित्य साधून आज परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात दुष्काळग्रस्त महिलांनी सत्याग्रह आंदोलनाला सुरूवात केलीय. प्रशासनाकडून आंदोलकांना प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलनही केलंय. दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीनं सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. तहसीलदारांनी रोहयोच्या कामांसाठीचं जॉब कार्ड देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी दिलीय.
मागण्या :
1) सोनपेठ शहरामध्ये रोहयो काम तात्काळ सुरू करा, जॉब कार्डचं वाटप करा
2) सोयाबीन विम्यासह खरीप 2018 पिक विमा द्यावा.
3)निराधारांचे त्रुटी मधील असलेले अर्ज तात्काळ निकाली काढावेत.
4)सोनपेठ तालुक्यात तात्काळ चारा छावण्या सुरू करा.
5)सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करा.
6)माजलगाव प्रकल्पातून सोनपेठ तालुक्यसाठी पाणी वाटप करा..
७) सोनपेठ तालुक्यात कृषी विभागामार्फत रोहयोची कामं तात्काळ सुरू करा
८) सर्व दुष्काळग्रस्त जनतेला सरसकट रेशन पुरवठा करा
९) अण्णासाहेब पाटील मंहामंडळाची कर्ज प्रकरणं निकाली काढण्यात यावीत