Success Story : बीड जिल्ह्यातील महिलांची भरारी, परदेशात गांडुळांची निर्यात

महिला बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. याच संधीचा फायदा घेत बीड जिल्ह्यातील पारनेर गावातील महिलांनी आता परदेशातील बाजारपेठेतही धडक दिली आहे. आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2022-05-21 06:14 GMT

महिला बचतगटाच्या माध्यमातून बीडच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर या गावातील महिलांना अनोखी कामगिरी करुन दाखवली आहे. तेजस्विनी महिला बचतगटाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मितीबरोबरच गांडुळांची निर्मिती करून जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलं आहे. बचतगटाच्या माध्यमातून या महिलांनी ओमानमध्ये ६० हजार किलो गांडुळांची विक्री केली आहे. त्याचबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश यासारख्या राज्यांमध्येही या महिला बचत गटांनी गांडूळ विक्री केली आहे. शेतीसाठी लागणाऱे रासायनिक खत न वापरता करता गांडूळखताचा वापर करून आपल्या शेतातील उत्पन्नातही या महिलांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेतले आहे. आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा स्पेशल रिपोर्ट

Full View

Tags:    

Similar News