परिस्थितीला जिद्दीने सामोरे जात महिलेने सुरू केला पंक्चर काढण्याचा व्यवसाय
परिस्थिती माणसाला जगायला शिकवते,असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात. या अडचणींना तो व्यक्ती कशा प्रकारे सामोरे जातो हे ज्याच्या त्याचावर अवलंबून आहे. पण अनेकजन अडचणींचा बाऊ न करता. येणाऱ्या अडचणीचा गंभीरपणे सामना करून अडचणीतून मार्ग काढत अनेकजण या जगात यशस्वी झाले आहेत. अशीच यशस्वी कथा सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्याील तिर्हे गावातील वनिता खराडे या यशस्वी महिलेची आह, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...;
पंक्चर काढण्याच्या व्यवसायात प्रामुख्याने पुरुषांची मक्तेदारी असल्याचे दिसते. पण या पंक्चरच्या व्यवसायात सोलापूर जिल्ह्यातील वनिता खराडे या महिलेने आपले कौशल्य वापरत यशस्वी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या काळात शेतमजूर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी गाड्यांच्या चाकांचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय दहा वर्षापूर्वी सुरू केला. अतिशय अडचणीतून मार्ग काढत त्यांनी आज गॅरेजचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या दोन चाकी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम ही करतात. पूर्वीच्या काळी आपल्या देशात महिलांवर अनेक बंधने होती. त्यांना सर्वच गोष्टीपासून वंचित ठेवले जात होते. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क नाकारले होते. समाजाने त्यांना कायमच दुय्यम स्थान देवून त्यांच्यावर जाचक अटी लादल्या होत्या. त्यांना पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा या देशात रूढ होती. या खुळचट प्रथाना देशातील महापुरुषांनी विरोध करून ही प्रथा बंद केली. महिलांच्या उन्नतीसाठी महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या योगदानामुळे आज महिला अटकेपार झेंडा लावू शकल्या आहेत. देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी सुरू केली होती. मुलींना शिक्षण देण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे अमूल्य असे योगदान आहे. त्यांनी समाजातील कर्मठ लोकांचा विरोध जुगारून मुलींना शिक्षण देण्याचे काम केले. 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधानाची अमलबजांवणी सुरू झाली आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले. त्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या सविधानामुळे आज महिला विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेत आहेत. त्यांच्या या यशामागे महापुरुषांचा त्याग आहे. त्यामुळेच महिलांना महापुरुषांचे योगदान विसरून चालता येणार नाही.
परिस्थिती माणसाला जगायला शिकवते
परिस्थिती माणसाला जगायला शिकवते,असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात. या अडचणींना तो व्यक्ती कशा प्रकारे सामोरे जातो हे ज्याच्या त्याचावर अवलंबून आहे. पण अनेकजन अडचणींचा बाऊ न करता. येणाऱ्या अडचणीचा गंभीरपणे सामना करून अडचणीतून मार्ग काढत अनेकजण या जगात यशस्वी झाले आहेत. अशीच यशस्वी कथा सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्याील तिर्हे गावातील वनिता खराडे या यशस्वी महिलेची आहे. दहा वर्षापूर्वी वनिता खराडे यांचे पती एमआयडीसीत कामाला जात होते. परंतु त्यांच्या तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा सुरळीत चालत नव्हता. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली होती. याच दरम्यान वनिता खराडे या दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला जात होत्या. त्याकाळी फक्त तीस रुपयांच्या आसपास रोजगार होता. त्यांच्या पतीच्या घरी पूर्वी पंक्चरचा व्यवसाय होता. त्यामुळे पतीला गाड्यांची पंक्चर काढता येत होती. दोघा पती पत्नीने गाड्यांच्या पंक्चरचे दुकान टाकायचे ठरवून त्यासाठी छोटासा गाळा भाड्याने घेतला. या दुकानावर पंक्चरच्या गाड्यांची संख्या जास्त असायची त्यामुळे वनिता खराडे यांनी पतीला व्यवसायात मदत करण्याचे ठरवून त्यांनी पंक्चर काढण्याचे काम शिकण्यास सुरुवात आणि तब्बल सहा महिन्याच्या कालावधी वनिता खराडे पंक्चर काढण्याचे काम शिकल्या. त्यांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. त्या सातत्याने पतीला कामात मदत करत राहिल्या. यातून त्यांना महिन्याकाठी वीस ते तीस हजार रुपये मिळत होते. त्या कालांतराने ट्रक,जेसीबी,टेम्पो,ट्रॅक्टर या मोठ्या गाड्यांच्या पंक्चर काढण्यास शिकल्या. त्यांच्या या कामात त्यांना त्यांच्या वडिलांची आणि पतीची मोलाची साथ मिळाली. त्यामुळेच त्या पंक्चरच्या व्यवसायात यशस्वी झाल्या आहेत. हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत जावून त्यांनी आज पंक्चरच्या दुकानासोबत टू-व्हीलर दुरुस्तीचे गॅरेज ही सुरू केले आहे. त्यांच्या कामात त्यांना आता मुलाची आणि पतीची मदत मिळत आहे.
पंक्चरचे दुकान टाकण्यासाठी वडिलांनी केली आर्थिक मदत
वनिता खराडे यांना त्यांच्या वडिलांनी दुकान टाकण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यामुळेच त्या या व्यवसायात यशस्वी झाल्या असल्याच्या सांगतात. पंक्चर काढण्याचे काम फक्त पुरुषांचे समजले जाते. प्रामुख्याने या व्यवसायात पुरुष वर्गाची मक्तेदारी असल्याचे दिसून येते. परंतु दहा वर्षापूर्वी पुरुषी मक्तेदारीला आव्हान देत. पंक्चर च्या व्यवसायात पाय ठेवला आणि त्यात यशस्वी झाल्या. सोलापूर रत्नागिरी महामार्गावर तिर्हे गाव असून त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात पत्र्याच्या शेडमध्ये पंक्चरचे दुकान सुरू केले होते. त्यासाठी अकराशे रुपये भाडे द्यावे लागत होते. वनिता खराडे यांचे शिक्षण अवघे सहावी पर्यंत झाले असून त्यांनी पंक्चरच्या व्यवसायात मजल मारली आहे. त्यांना या व्यवसायातून महिन्याकाठी वीस ते तीस हजार रुपये मिळत होते. व्यवसायासाठी बँकेकडे कर्ज मागण्यास गेल्यानंतर त्यांना कर्ज नाकारण्यात आले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही. सावकाराकडून त्यांनी व्याजाने कर्ज घेवून पुन्हा दुकानाची उभारणी केली. सुरुवातीच्या काळात त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. पण आज त्या आयुष्यात यशस्वी उद्योजक झाल्या आहेत.
वनिता खराडे यांच्या कष्टामुळे मुलांची प्रगती
वनिता खराडे यांनी आयुष्य संघर्ष करत मोठी झेप घेतली आहे. आज त्यांची मुले त्यांच्या कष्टामुळे यशस्वी होताना दिसत आहेत. त्यांच्या मुलाने डिझेल मेकॅनिकल चा कोर्स केला असून तो सध्या स्वतःच्या गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करत आहे. तर मुलगी इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या त्यागामुळे आज त्यांची मुले यशस्वी होताना दिसत आहेत. पंक्चर काढण्याच्या दुकानापासून सुरुवात झालेल्या व्यवसायाचे रूपांतर आता गॅरेज मध्ये झाले आहे. याठिकाणी टू व्हीलर गाड्याचे स्पेअर पार्ट देखील मिळतात. आज त्यांचा उद्योग भरभराटीला आला आहे.