मोदीजी आणि भाजप नेते माफी मागणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. पण यानंतरही अनेक प्रश्नांची उत्तरं मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी द्यावी लागणार आहेत.;

Update: 2021-11-20 04:45 GMT

शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे सपशेल माघार घेत पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी माफी मागत असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांपुढे सरकारने माघार घेतल्याची ब्रेकिंग न्यूज सर्वत्र चालली....शेतकऱ्यांनी, विरोधी राजकीय पक्षांनी जल्लोष केला, तर भाजपचे नेते मोदींच्या माघार घेण्याला ग्लॅमर मिळवून देण्याच्या प्रयत्नात दिसले. पण एकीकडे शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणणाऱ्या मोदींनी याच शेतकऱ्यांनी आंदोलनजीवी म्हटले होते, त्याबद्दल ते माफी मागणार का, हा प्रश्न आहे.

केवळ मोदीच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर असभ्य टीका करण्यापासून ते त्यांना दहशतवादी ठरवण्यापर्यंत वक्तव्य केली होती. यापैकी काही वक्तव्ये खालील प्रमाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी – "शेतकरी आंदोलनामागे आंदोलनजीवी"




 

नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री – "गर्दी जमली म्हणून कायदे रद्द केले जात नाहीत"



 


पियुष गोयल, केंद्रीय मंत्री- "शेतकरी आंदोलन आता माओवादी विचारसरणीच्या लोकांच्या ताब्यात गेले आहे"



 


व्ही.के.सिंग, केंद्रीय मंत्री – "आंदोलनात सहभागी झालेल्यांपैकी अनेकजण शेतकरी वाटत नाहीत"



 


रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री - "आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात"



 


मनोज तिवारी, भाजप खासदार – "आंदोलक शेतकरी हे तुकडे तुकडे गँगशी संबंधित आहेत"

रतनलाल, भाजपचे खासदार - "या शेतकऱ्यांना इथेच मरायचे होते"

जे.पी.दलाल, हरियाणाचे कृषी मंत्री- "शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान"

बी.सी.पाटील, कर्नाटकचे कृषीमंत्री – "आत्महत्या करणारे शेतकरी भित्रे आहेत"*

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे मोदींनी माघार तर घेतली आहे. पण आता आपल्या आंदोलनजीवी वक्तव्याबाबत ते माफी मागणार का? भाजपच्या इतर नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दलही त्यांना माफी मागायला लावणार का? एवढेच नाही तर लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्रीपुत्राच्या कृत्यानंतर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेऊन आपल्याला खरंच शेतकऱ्यांचा कळवळा आहे हे मोदी सिद्ध कऱणार का, हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.

Tags:    

Similar News