केंद्र सरकारने अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करात ४ वर्ष नोकरीच्या योजनेची घोषणा केली आहे. पण चार वर्षांनंतर यातील मोजक्या तरुणांना नोकरीत घेऊन उर्वरित तरुणांना विशिष्ट रक्कम देऊन परत पाठवले जाणार आहे. या योजनेला आता अनेक स्तरातून विरोध होतो आहे. हा निर्णय़ घेणाऱ्या मंत्रिमंड़ळातील मंत्र्यांचा कालावधी ५ ऐवजी १ वर्ष करणार का, असा सवाल एका संतप्त तरुणाने केला आहे. ४ वर्षांनंतर आम्ही पुन्हा बेकार होणार असू तर उपयोग काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. सैन्यात भरती होण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या तरुणांना या निर्णयाबद्दल काय वाटते आहे, हे जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...