
पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक त्रासदायक रुढी परंपरा जपल्या जात आहेत. याविरोधात मॅक्स महाराष्ट्रने सातत्याने आवाज उठवला आहे. जातपंचायतीला मूठमाती दिली जात असल्याच्या अनेक घोषणा झाल्या, सामाजिक बहिष्कार घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सामाजिक बहिष्कार कायदा आहे. पण आजही अनेक जातींमध्ये जात पंचायतीचे पंच लोकांना आर्थिकदृष्ट्या लुबाडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच अनेक कुटुंबांवर बहिष्कार टाकला जातो आहे. मॅक्स महाराष्ट्र सातत्याने यासंदर्भातल्या बातम्या आणि त्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करत आहे.