रेल्वे कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे बोनस का दिला जात नाही?
दिवाळी म्हटलं की अनेक सरकारी कर्मचारी बोनसच्या प्रतीक्षेत असतात. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून नियमांप्रमाणे बोनस मिळत नसल्याने रेल्वे कर्मचारी निमुटपणे अन्याय सहन करत आहेत. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रत्येक दिवाळीत बोनसच्या बाबतींत नेहमीच फसवणूक का होते. याबाबत रेल्वे कर्मचारी संभ्रमात आहेत.;
मुंबईतील अनेक लोक रेल्वे ने प्रवास करत असतात. रेल्वे लोको पायलट देखील आपल हे काम प्रामाणिकपणे करत असतात. परंतु ज्यांचे बेसिक वेतन 70,000 आहे. त्यांना वार्षिक वेतनाप्रमाणे 1 लाखापेक्षा अधिक बोनस मिळण अपेक्षित आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना फक्त 17000 रुपय बोनस गेल्या पाच वर्षांपासून दिला जातोय.
अशा रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या आठरा लाख आहे. त्यांनी या बाबत केंद्रीय रेल्वे विभागाला पत्र पाठवून याबाबत विचारणा देखील केली. त्यांच्या या पत्राला केंद्रीय रेल्वे विभागाकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.
रेल्वे कर्मचारी यांना दिवाळीचा बोनस नियमाप्रमाणे का मिळत नाही. याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधिकृतपणे माहीती देण्यास नकार दिला. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत रेल्वे विभाग सर्तक का नाही असा प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रत्येक दिवाळीत होणारी दिशाभूल कधी थांबले या प्रश्नाचं उत्तर अनुत्तीर्णच आहे. त्यांच्या या फसवणूकीला केंद्रीय विभागाकडून न्याय देण्यास कोण महत्वाची भूमिका बजवेल ते येणाऱ्या दिवसात पाहणं महत्वाचं ठरेल.