पालघर जिल्ह्यात शासकीय शव वाहिका नाहीत याला जबाबदार कोण..?

आदिवासी भागातील चिमुकल्याला शववाहीका न मिळाल्यामुळं चाळीस किलोमीटर बाईकवर प्रवास कराव्या लागणारी खळबळजनक घटना मॅक्स महाराष्ट्रनं उघडकीस आणल्यानंतर महाराष्ट्र हादरुन गेला आहे. शववाहीका नाहीत याला जबाबदार कोण? जिल्हा नियोजनाच्या बैठकीत लोकप्रतिनिधी प्रशासन करतात तरी काय..? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.;

Update: 2022-01-28 09:35 GMT

आदिवासी भागातील चिमुकल्याला शववाहीका न मिळाल्यामुळं चाळीस किलोमीटर बाईकवर प्रवास कराव्या लागणारी खळबळजनक घटना मॅक्स महाराष्ट्रनं उघडकीस आणल्यानंतर महाराष्ट्र हादरुन गेला आहे. शववाहीका नाहीत याला जबाबदार कोण? जिल्हा नियोजनाच्या बैठकीत लोकप्रतिनिधी प्रशासन करतात तरी काय..? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

शासन व लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे वर्षानुवर्षे जव्हार मोखाड्यातील आदीवासी बांधव मरणयातना भोगत आहे .आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे व ढिसाळ कारभारामुळे अनेक वेळा घडलेल्या प्रसंगावरून अधोरेखित झाले आहे .

नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे आरोग्य विभागाची अब्रू वेशीवर टांगली गेली असून. मृत्यूदेहाची ये- जा करण्यासाठी जिल्ह्यात कुठेच शासकीय शव वाहिक नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आले, असून शव वाहिकेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे ,यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासन जिल्ह्याच्या विकासा बाबत नियोजन केल्या जाणाऱ्या, जिल्हा नियोजनाच्या बैठकित करतात तरी काय असा संतप्त सवाल या निमित्ताने विचारला जात आहे .

जव्हार उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्याने कडाक्याच्या थंडीत 40 किमी अंतरा पर्यत चिमुकल्याच्या मृतदेह कुटूंबियांना दुचाकीवरून न्यावा लागल्याची, धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून. ह्या घटनेची जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ संजय बोदाडे विभागाने यांनी गंभीरतेने दखल घेऊन दोन वाहन चालकांना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच चार कर्मचाऱ्यांवर कारवाईत टांगती तलवार आहे. यामुळे होणाऱ्या पुढील कारवाईच्या बचावासाठी कुटीर रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ रामदास मराड हे शववाहिका नसल्याने चालक पैसे मागत होते असे सांगत आहेत परंतु उपजिल्हा दर्जाचा रुग्णालय असताना त्या ठिकाणी शववाहिका का नाहीत याला जबाबदार कोण..? शव वाहिका नव्हत्या परंतु रुग्णवाहिका नव्हत्या का? घटनेचे गांभीर्य कुट्टीर रुग्णलाच्या लक्षात आले नाही का ? यामुळे हा सर्व प्रकार चीड आणणारा असून यामध्ये दोषी असलेल्या सर्वांनवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Tags:    

Similar News