शेतकरी आत्महत्या का करतो?
बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो याच बीड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आपण पाहिल्या आहेत त्याचबरोबर गेल्या वर्षी म्हणजे 2021 या वर्षी 210 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यापैकी 161 आत्महत्या पात्र ठरल्या आहेत तर 14 आत्महत्या अजूनही त्याचा अहवाल येणे प्रलंबीत आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 या काळात एकूण 86 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात या आत्महत्या रोखण्यासाठी शासन व प्रशासन कशा पद्धतीने काम करत आहे व बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या का करतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्या विषयी दिलेल्या प्रतिक्रिया याविषयीचा महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट...;
जगाच्या पाठीवर भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे पण या ठिकाणचे शेतकऱ्याची जर अवस्था आहे. या व्यवस्थेने पिछलेलं आलेले आहे प्रत्येक ठिकाणी शेतकर्यांची हेळसांड होत आहे ते पाहून या देशाला कृषिप्रधान देश म्हणून म्हणण्याची लाज वाटत आहे. अशी परिस्थिती झाली आहे. प्रत्येक ठिकाणी खते बी-बियाणे खरेदी करताना त्याला कंपनीने ठरवल्या भावापेक्षाही चढ्या भावाने त्याला खरेदी करावी लागते .जेव्हा शेतकऱ्याकडे मालक विक्रीला येतो तेव्हा तो एक एकर कांदा तयार करण्यासाठी एक लाख रुपये खर्च येतो .व त्याचे एक लाख रुपये खर्च व त्याचा मेहनताना म्हणून 50 हजार रुपये तरी यायला पाहिजेत. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेस मला तुम्ही बाजारात घेऊन जातात त्या वेळेस त्याचे पैसे येतात फक्त 50 हजार रुपये. पण प्रत्येकच वेळेस जर 50 हजार रुपये लॉसमध्ये जात असेल तर तो कुठपर्यंत सहन करणार आहे. तर कुठपर्यंत टिकणार आहे याला शासन व्यवस्थेनं प्रशासनाने लक्ष घालून मूळजी मालाची किंमत आहे त्यावर कुठेतरी लक्ष द्यावे. कुठल्याही कंपनीचा जर माल असेल तर त्याचा भाव कंपनी ठरवते मात्र इथं शेतकऱ्यांचा मालाचा भाव मात्र दुसरे ठरवतात ते योग्य ठरवत नाहीत. सध्या परिस्थितीमध्ये पीक कर्जाची वाटप व बियाणे खतांचे भाव सध्या स्थिर आहेत. कारण शेतकर्याकडे पैसा नाही पिक कर्ज अजून दोन महिने वाटप होत नाही .दोन महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या लागवडी होऊन जातात शेतकरी दुसऱ्याकडून उसने पासने घेऊन शेतामध्ये पेरणी करतो त्यानंतर शेतकऱ्यांकडे पिक कर्ज येतं तेही इकडं तिकडं चिरीमिरी देऊन मंजुर करून घ्यावं लागतं .आणि आज जे खाता चं होतं दोन हजार रुपयाला मिळत आहे. ते सिझनमध्ये चार हजार रुपयाला मिळते शासनाची केलेली मदत ही वेळेवर पोहोचत नाही. ती जर मदत वेळेवर पोहोचली तर शेतकऱ्यांचा फायदा होईल तरुण वर्ग हा संयमी नाही जुना शेतकरी जसा संयमी होता. तसा शेतकरी तसा संयमी नाही व नवीन शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की नवनवीन प्रयोग व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकवली पाहिजे व शेतीमध्ये काही बदल करून व स्वतः मध्येही काही बदल करा बाजारपेठेशी संलग्न राहून जे बाजारात विकते तेच पिकवले पाहिजे .दोन्हीची सांगड ज्यावेळेस घालू त्यावेळेसच शेतकरी वाचेल नवीन पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. शासनाने पण या गोष्टीकडे लक्ष देऊन नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करण्यासाठी आव्हान केले पाहिजे. तरुण शेतकऱ्यांना मी एवढेच आव्हान करतो की कुठलेही टोकाचं पाऊल उचलू नका आत्महत्या हा पर्याय नाही. आपलं कुटुंब उघड्यावर पडतंय पत्रक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीशी संलग्न रहावे असे शेतकरी आदिनाथ कुडके म्हणाले.
शेतकरी आत्महत्या करतो कारण त्याला पीककर्ज ही वेळेवर मिळत नाही अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिलेले आहेत .ज्यांना मिळालं त्यांना पुन्हा अनुदान ही शासनाने दिलं आहे पण जे शेतकरी वंचित राहिले आहेत .त्यांना मात्र लाभ मिळाला नाही शेतीसाठी वीज ही फक्त वर्षा मधून दोन महिने लागते पण आमच्याकडून मात्र बाराही महिन्याचे पैसे वसूल केले जात आहेत. खरी लाईट ची गरज फक्त शेतकऱ्याला दोन महिन्यात असते तेवढ्या वेळेत शेतकऱ्याला लाईट व्यवस्थित मिळाली नाही. तर त्या ठिकाणीच शेतकरी लॉसमध्ये जातो त्या दोन महिन्यांमध्ये ही अनेक त्रास सहन करावे लागत आहेत .शेतीसाठी अनेक वेळा मजूर मिळत नाही त्यामध्येही शेतकरी लॉस मध्ये जातो शेतकऱ्यांना खत बी बियाणे वेळेच्या वेळेला मिळत नाहीत. मिळाले तरी दामदुप्पट द्यावे लागतात त्यांच्या बियाण्याचे भाव 25 किलोची बॅग 3500 रुपयाला पण शेतकऱ्याकडे माल आल्यानंतर त्याला एका क्विंटलसाठी 3500 रुपये सुद्धा भाव मिळत नाहीत. 2200 किंवा 2500 या दराने विकावं लागतं आणि शेतकऱ्याला सोयाबीन ची बॅग 3500 रुपयेला घ्यावी लागते. सोयाबीन शेतकऱ्याकडे जर पिकली तर भावांमध्ये सापडत नाही नैसर्गिक आपत्ती मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. शेतकऱ्याचा माल पाऊस जास्त आला तर वाहून जातो व कमी पडला तरी वाळून जातो शेतकऱ्याला अगदी दोन महिन्यासाठी वीज लागते शेतकरी बिल भरायला ही तयार आहे. पण ही वीज रात्री 12 नंतर येते व पहाटे चार वाजता जाते त्याच्यामध्ये व्यवस्थित लाईट टिकत नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी कसं करायचं शेतकऱ्यांना 12 तास लाईट देण्याऐवजी आठ तास द्या कोणती कंटिन्यू द्या मुळे सुद्धा शेतकरी अडचणीत येत आहे असे शेतकरी नारायण आगाम यांनी सांगितले.
आम्ही शेतकरी आहोत म्हणून आम्हाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कळकळ वाटते. याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आम्ही 2020 ला पिक विमा भरला होता तो पिक विमा अजूनही आम्हाला मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली. ते कोर्टातही गेले यांना पिक विमा मिळाला पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची तक्रार दिलेली नाही.त्यांना 2021चा पिक विमा अजून मिळालेला नाही .ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत तक्रार दिली त्यांना पिक विमा मिळाला ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली नाही .त्यांना पिक विमा मिळाला नाही व बाकीच्या शेतकऱ्यांचं काय प्रत्येक शेतकरीच 72 तासाच्या आत तक्रार देऊ शकत नाही याकडे सरकार लक्ष देत नाही हे सरकार शेतकऱ्याला जर पिक विमा मिळून देत नाही. तर मग शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का..? शेतकऱ्यांना जर वेळेवर पिक कर्ज पिक विमा दिला तर शेतकऱ्यावर ही वेळ येणार नाही. आत्महत्या करण्याची शेतकऱ्या जर वेळेत पैसा मिळाला तर त्याच्या डोक्याला लोड येणार नाही व शेतकरी आत्महत्या करणार नाही. वेळेवर न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आत्महत्या ला तयार होतो. कौटुंबिक अडचणीमुळे त्याला त्रास होतो शेतीसाठी खर्च करण्यासाठी लोकांकडून उसने घेतलेले पैसे परत वेळेवर जर गेले नाही तर लोक पुन्हा पैसे देत नाहीत.आणि जर पिक विमा वेळेवर पिक कर्ज वेळेवर मिळालं तर त्याला अडचण येत नाही
सात जून जवळ आला आहे शेतकऱ्याला बी बियाणे खत घ्यावे लागत आहेत बँकेने जर पैशाची उपलब्धता केली तर शेतकऱ्याला अडचण येणार नाही गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शेती या पिकाची नुकसान झाली त्यामुळे शेतकरी फार अडचणीत आहे जुनमध्ये लवकरात लवकर बँकेने शेतकऱ्याला हातभार लावला पाहिजे बँकेच्या दारात गेलं की बँका परत पाठवतात असे, शेतकरी निवृत्ती कांबळे म्हणाले.
शेतकरी आत्महत्या करण्यात मागचं कारण असं आहे की शेतकरी अगोदरच कर्जबाजारी झालेला असतो. शासनाने जो मालाला भाव केलेला असतो तो भाव शेतकऱ्याला मिळत नाही या शेतकऱ्याकडे मालक होतो त्या वेळेस शेतकऱ्यांच्या मालाला भाव राहात नाही. आज कापसाची काय परिस्थिती आहे आम्ही कापूस 8500 रुपयांनी विकला आज 13 हजार 500 रुपये आहे. व्यापारी पाऊस साठवून ठेवतात शेतकऱ्याकडे काही माल राहात नाही त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते .ऊस पिकाचेही तसंच झालं आहे .आपल्या मराठवाड्यामध्ये एकूण 46 साखर कारखाने आहेत या कारखान्यांनी बाहेरचा पाऊस आणला त्यामुळे इथल्या ऊसाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली त्यांना ऊस पेटवून दिल्याशिवाय पर्याय राहिला नाही.
सरकार आहे ते दळभद्री सरकार आहे शेतकऱ्यांच्या मुळावर आलेलं आहे. हे सरकार कुठलाही निर्णय घेत नाही आपल्याकडे पंतप्रधान पिक विमा योजना लागू झालेली आहे .तीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही 2020 चा पिक विमा मिळाला नाही 2021 चा पिक विमा मिळाला नाही. या सरकारचं काय कर्तव्य आहे या सरकारवर रिमोट कंट्रोल नसल्यामुळे मरण पत्कारायची पाळी आली आहे .बीड जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडतो यामुळे जास्त जर पाऊस झाला तर पीक वाहून जातात व कमी पडला तर वाळून जातात व शेतकरी हतबल होतो. त्याला आत्महत्या करण्याची पाळी येते यासाठी शेतकऱ्यांना योग्य वेळी अर्थसहाय्य केलं पाहिजे सरकार हे शेतकर्यांचे काहीही विचार करत नाही, असे शेतकरी भगवान आगाम म्हणाले.
आता काहीच परवडत नाही आणि काय करावं तेही समजत नाही आता तरुण मुलं काहीही करतात आम्हाला विचारत नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याच डोक्यानं होऊन देत आहोत.शेणखत टाकून जमीन पिकत होती आता जनावरं कमी पाळत असल्यामुळे जनावरांचा पाळण्यासाठी जो खर्च लागत आहे.तो निघत नाही शेणखत नसल्यामुळे रासायनिक खत घ्यावं लागतं.. आणि त्या खतामुळे पिकतं ते भसर येत नाही पहिल्या मोट असायच्या आता मोटर आल्या त्यामुळे दोन तासातच विहिरीतलं पाणी उपसलं जातं पहिलं दिवसभर काम करावं लागत होतं.
शेतकरी या नात्यानं तर सांगायचं झालं तर मूळ मुद्दा असा झालेला आहे की शेती आहे तेवढीच आहे. जमिनीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे शेती कमकुवत होत चालली आहे शेतकरी आत्महत्या करण्यामागचा मूळ कारण असा आहे की बियाणं घेता वेळेस जे बियाना आहे ते दोन ते तीन हजार रुपये किलोप्रमाणे घ्यावं लागतं ते विकल्यानंतर त्याचा जो भाव आहे तो योग्य मिळत नाही. ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याचा भाव कमी असतो त्याचं गणित जर केलं तर तो आम्हाला दहा ते बारा रुपये किलो प्रमाणे पडतो. आणि जर विकायचे म्हटलं तर पाच ते सहा रुपये किलो प्रमाणे विकावा लागतो शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार पर्यायच उरत नाही .त्यामुळे शेतकरी तग धरत नाही कारण कशी तग धरणार कोणत्याही पिकाची बियाणं लागवड खुरपं पाणी देणे औषधी फवारणी याचा जर हिशोब केला तर दिड एकरचा तो हिशोब 90 हजार रुपयांपर्यंत जातो. त्याचा माल जर विक्री करायला गेलात तर जास्तीत जास्त 50 ते 55 हजार रुपये देतात असं जर उत्पन्न मिळालं आणि त्याला जर भाव कमी मिळाला तर आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय काय..? त्याचा वरचा खर्च आहे तो कुठून टाकणार असे शेतकरी जीवन आगाम म्हणाले.
आम्ही सावकाराकडून कर्ज घेतो आम्ही सावकाराकडे जातो सावकार आमच्याकडे येत नाही. पिक आम्हाला कात धोका देतात कधी बियाणे बोगस निघत तर कधी डीपी जळाली तर त्याच्याकडे सहा-सहा महिने लक्ष देत नाहीत लाईट आली तर तोपर्यंत आमचं पिक जळून जातं. अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या आहेत दुष्काळ पडल्यावर पाण्याची फार अडचण येते ज्यावेळेस आम्ही सावकाराकडून पैसे घेतो. त्यावेळेस ते पैसे परत करायचे असतात दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही घेतलेले पैसे आम्हाला परत करावेच लागतात. घरामध्ये सुद्धा अनेक वेळा विरोध येतो व आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते एखाद वेळेस मुलीचे लग्न केलं आणि त्यावेळेस सावकाराकडून कर्ज घेतलं ते फेडण्यासाठी अडचण येते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात जमिनीचे तुकडीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या शिक्षणासाठी पैसा राहत नाही जे मुलं शिकले आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत आता मुलगा मोठा झाला आहे.
.मुलगी मोठी झाली लग्न करायचं कशानं त्या वेळेला आम्ही सावकाराचे कर्ज काढतो आणि ते नाही भेटलं तर शेतकरी आत्महत्या करतो. माझ्याकडे दहा एकर जमीन आहे सहा मुलं आहेत त्यांना प्रत्येकाला तीस ते पस्तीस गुंठे जमीन वाटून गेली आहे. जमिनीचे तुकडे करण झाल्यामुळे घरांमध्येही वाद विवाद निर्माण होतात जे मुलं आहेत त्यांना काहीतरी उद्योग धंदा मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे. अशीच आमची मागणी आहे. कोणताही उद्योग करायचं म्हटलं तर एक दुकान टाकलं तर दुसरे अजून चार दुकानं उभी राहतात .त्यामुळे तो उद्योगही चालायचा कसा हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे बेरोजगारी वाढल्यामुळे चोऱ्या होता त्याला कारणीभूत म्हणजे उद्योग आहे. उद्योग नसल्यामुळे ही उद्योग या तरुणांच्या डोक्यात येतात असं शेतकरी शेख दाऊत म्हणाले.