देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?
देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान कोणाला मिळाला? जाणून घेण्यासाठी वाचा;
2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देशात तरुण मुख्यमंत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नावावर आहे. शरद पवार यांनी ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे १८ वे मुख्यमंत्री वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांची राज्यातील दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री म्हणून गणना होते.
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांचाही ५० वर्षांखालील मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव सामील झाले आहे. अलीकडच्या काळात ५० वर्षांखालील मुख्यमंत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
सध्या देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश राज्याची दुसऱ्यांचा जबाबदारी सांभाळणाऱ्या योगी आदित्यनाथ वय ४९ यांचा समावेश आहे. देशात पूर्वी वयोवृद्ध व्यक्तींना खास करून राजकारणाचा २०-३० वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री केलं जात होते. अशा काळात एखाद्या तरुणाची हाती मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली तर आश्चर्य व्यक्त केलं जायचं. आता काळ बदलला आहे. देशातील अनेक राज्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती आहेत.
कोण आहेत देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री?
आपल्या देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून MOH फारूक यांचे नाव लागते. 1967 मध्ये वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी त्यांनी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. त्याच वेळी, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी देखील 1970 मध्ये वयाच्या 43 व्या वर्षी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. जर आपण ईशान्येकडील राज्याबद्दल विचार केला, तर आसाम गण परिषदेचे नेते प्रफुल्ल कुमार महंता यांनी वयाच्या 34 व्या वर्षी 1985 मध्ये आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाचा मान शरद पवार यांना जातो. त्यांनी 1978 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.
तरुण वयात राज्याची धुरा सांभाळण्याची संधी मिळालेले बहुतांश नेते (भाजप वगळता) राजकीय घराण्यातील असल्याचं दिसून येतं. यापूर्वीही या नेत्यांच्या कुटुंबातील कोणी ना कोणी मुख्यमंत्री असल्याचं दिसून येतं. अशा नेत्यांच्या यादीत पहिले नाव जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांचे येते. 2009 मध्ये ओमर अब्दुल्ला यांनी वयाच्या 38 व्या वर्षी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
या यादीत पुढचं नाव आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांचं. सध्या ते समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत. अखिलेश यादव यांनी 2012 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या विजयानंतर वयाच्या 38 व्या वर्षी राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे आणि देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. पुढच्याच वर्षी 2013 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनी वयाच्या 37 व्या वर्षी झारखंडचे मुख्यमंत्री झाले.
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी 2019 मध्ये वयाच्या 46 व्या वर्षी स्वबळावर विधानसभा निवडणूक जिंकून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांचे वडील वायएस राजशेखर रेड्डी यांचं मुख्यमंत्री असताना 02 सप्टेंबर 2009 ला हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं.. त्यांच्या मृत्यूनंतर जगनमोहन यांचे काँग्रेससोबत मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन करून सत्ता मिळवली.
मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक तरुण मुख्यमंत्री म्हणून चेहरे समोर आले आहेत. त्यामध्ये कोणताही राजकीय वारसा नसलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. त्यांनी 2013 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी काँग्रेसच्या पाठिंब्याने दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2015 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जनतेने बहुमत दिले. 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही ते पुन्हा निवडून आले.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा तरुण मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश आहे, ते वयाच्या 37 व्या वर्षी प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री झाले.
गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे 48 वर्षांचे असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे 46 वर्षांचे आहेत. ५० वर्षांखालील मुख्यमंत्र्यांच्या यादीत चार मुख्यमंत्री भारती जनता पक्षाचे, एक आम आदमी पक्षाचा, एक YSR काँग्रेस आणि एक झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचा आहे.