...मग ती महिला पायलट कोण ?

Update: 2019-02-27 12:29 GMT

भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली. त्यानंतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या पोस्ट सुरू झाल्या. यावेळी सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करण्यासाठी भारतीय हवाई दलामध्ये एका महिला पायलटचा समावेश असल्याची एक पोस्ट मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाली.

https://youtu.be/musymFe4sTw

मात्र, मॅक्स स्कॅनरमधून जेव्हा या महिला पायलटच्या पोस्टची शहानिशा केली तेव्हा समोर आलेलं सत्य काही वेगळचं होतं. या पोस्टमधला फोटो हा स्नेहा शेखावत या महिला पायलटचा आहे. हा फोटो प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या वेळेचा आहे. त्यावेळी स्नेहा शेखावत यांनी भारतीय हवाई दलाचे परेडमध्ये नेतृत्व केलं होतं. तर सोशल मीडियावरच्या खोट्या पोस्टमध्ये स्नेहा शेखावत यांनी हवाई हल्ल्याचं नेतृत्व केल्याची खोटी पोस्ट कुणीतरी खोडसाळपणे व्हायरल केली होती, ही वस्तुस्थिती आहे.

Similar News