साताऱ्यात दहशतवाद्यांना कोणी दिला आसरा ?

Update: 2023-07-27 09:24 GMT

एटीएसनं पाटणच्या जंगलात पकडलेल्या दहशतवाद्यांना तिथं आसरा कुणी दिला हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. एटीएसनं सतर्कता दाखवल्यानं नाकाबंदीमध्येच या दोन्ही दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलंय. पाटणच्या जंगलात एटीएसने पकडलेल्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले. आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे.

दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दहशतवाद विरोधी पथकाने तपासादरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टरमध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील पाटण तालुक्यातील जंगलात स्फोटकांची चाचणी घेतली असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आलीय. त्यामुळं संबंधित दहशतवादी कोठे राहिले ? त्यांना नेमका आसरा कोणी दिला ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून यामुळं जिल्ह्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला...

Tags:    

Similar News