दत्तक वस्तीतील कर्मचारी कुठे हरवलेत?
मुंबई शहराची ओळख "स्वच्छ मुंबई आपली मुंबई" अशी आहे, पण महानगरपालिकेती दत्तक वस्तीतील कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील कचरा साफ करण्यासाठी येत नसल्यामुळे मुंबईची ओळख अस्वच्छ झाली आहे का? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल, तर पहा आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राउंड रिपोर्ट..
मुंबईत शहरातील वॉर्ड क्रमांक 96 बांद्रा पूर्व येथील मुस्लिम सामाजातील लोकांची वस्ती पाहायला मिळतेय,काँग्रेस नेते हाजीआलम सिद्दीकी हे तेथील नगरसेवक आहेत. त्यामुळे दत्तक वस्तीतील कर्मचारी नेमके कुठे आहेत याचा शोध त्यांनी गेल्या पाच वर्षात घेतला नाही. त्यामुळे बांद्रा पूर्वेकडील शहरात लोकांना गेल्या पाच वर्षांपासून लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दत्तक वस्ती योजने अंतर्गत या शहरात सफाई करण्यासाठी कर्मचारी येत नसल्यामुळे रस्त्यांवर, नाल्यात, गल्लीत तर काही ठिकाणी घरांसमोर कचरा पाहायला मिळतोय.
बांद्रा शहरात पिण्याचीपाईपलाईन फुटल्यामुळे पाणी लोकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे लोकांनमध्ये संताप पाहायाला मिळतोय. फुटलेली पाईपलाईन महानगरपालिके तर्फे दुरुस्त केली जात नसल्यामुळे लोकांची नेहमीच गैरसोय होत असते. त्याचबरोबर कचरा उचलण्यासाठी आम्ही स्वतःच्या खर्चातून खाजगी माणूस ठेवलेला आहे. असे तेथील स्थानिक नागरिक सांगतात.
दत्तक वस्ती योजने अंतर्गत जर एखादा कर्मचारी नाला सफाई करण्यासाठी आला तर अर्ध्या तासासाठी 400-500 रुपये दिवसाला घेतात. नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर कर्मचारी येत असतात त्यामुळे वेतागलेल्या नागरिकांनी मार्ग काढायाचा तर कसा अशा प्रश्न स्थानिकांना पडलेला आहे.
आपण निवडूण दिलेल्या नगरसेवकाने कामे केली नाही तर आपली मुंबई स्वच्छ कधी होणार हा विचार करण्याची वेळ आता मतदारावर आली आहे.पुढील महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी आपल्या कामाची कर्तव्य जर पार पाडली तर पुन्हा एकदा महानगरपालिकेला म्हणता येईल, "आपली मुंबई स्वच्छ मुंबई."